अमडापूर (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांच्या आदेशाने दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी अमडापूर पोलीस ठाणे हद्दीत धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
ग्राम मंगरूळ नवघरे चौफुल्ली येथे राबविण्यात आलेल्या या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे NPC अनंता फरतळे यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणात दोन आरोपींविरोधात एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान देशी दारूचे तब्बल २८ बॉक्स जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत १ लाख ८ हजार ६४० रुपये आहे. याशिवाय S प्रोसो कंपनीची कार (किंमत सुमारे ३ लाख रुपये) असा एकूण ४ लाख ८ हजार ६४० रुपयांचा प्रोव्ही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या धडाकेबाज कारवाईत NPC अनंता फरतळे, NPC सुनिल मिसाळ, PC अमोल शेजोळ, PC गणेश वाघ व PC सतीश नाटेकर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली










