spot_img
spot_img

रक्त सांडलं… पण माघार नाही! पाकिस्तानी माऱ्यातही संतोष मोरे ठरले पोलादी ढाल! मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांची मानवंदना!

मेहकर (हॅलो बुलडाणा) देशाच्या सीमांचे रक्षण करताना प्राणांची पर्वा न करता शत्रूच्या छातीत धडकी भरवणारे शौर्य आजही जिवंत आहे, याचा ज्वलंत पुरावा म्हणजे सवडद (ता. सिंदखेडराजा) येथील हवालदार संतोष भगवान मोरे. ऑपरेशन ‘सिंदूर’दरम्यान दाखविलेल्या अदम्य पराक्रमाला मेहकर मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी शाल व पुष्पगुच्छ देत सन्मानित करत वीर जवानाला मानवंदना दिली.

कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार या अतिसंवेदनशील सीमारेषेवर १० मे रोजी पाकिस्तानी सैन्याच्या तोफगोळ्यांच्या भीषण माऱ्यात हवालदार संतोष मोरे यांचा उजवा हात गंभीररीत्या जखमी झाला. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी माघार न घेता चौदा पाकिस्तानी सैन्य व दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करत शत्रूला करारी प्रत्युत्तर दिले. जखमांपेक्षा देश मोठा, हीच त्यांची लढाऊ मानसिकता देशाला अभिमानास्पद ठरली.

या असामान्य शौर्याची दखल घेत भारत सरकारने यंदाच्या १५ ऑगस्ट रोजी त्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केला असून, येत्या १४ मार्च रोजी राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे. हा केवळ एका सैनिकाचा सन्मान नसून, देशासाठी झटणाऱ्या प्रत्येक जवानाचा विजय आहे.सत्कारप्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रशासनाच्या अपयशावर अप्रत्यक्ष बोट ठेवत स्पष्ट शब्दांत सांगितले, आपण सुरक्षित आहोत कारण सीमारेषेवर संतोष मोरेसारखे रणवीर उभे आहेत. त्यांचे शौर्य हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!