चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल)तालुक्यातील करतवाडी येथील युवक सतीश सदाशिव सपकाळ (वय ३५) यांचा आज संध्याकाळी 5 च्या दरम्यान भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. चिखलीहून आपल्या घरी करतवाडी येथे मोटारसायकल क्रमांक MH28 Z 6054 वरून जात असताना, अमडापूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या काळी-पिवळी वाहनाने (MH28 H 3379) गोविंदा शेळके यांच्या शेताजवळील पेठ चढावर जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की सतीश सपकाळांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघाताने परिसरात खळबळ उडाली असून, रस्त्यावरील वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.सतीश सपकाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










