डोंगरखंडाळा (हॅलो बुलडाणा) येथील गट नंबर 175 मधील 11.31 आर सामायिक शेतीवरून मोठा भू-विवाद चिघळला असून या प्रकरणात आता थेट पुणे येथील उपजिल्हाधिकारी व मंत्रालयातील ओ.एस.डी. सिद्धार्थ भंडारे यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. पीडित राहुल मिननाथ तारे यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या तक्रारीत धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत.राहुल तारे यांनी सांगितले की,त्यांच्या कुटुंबाची सामायिक जमीन अनेक दशकांपासून त्यांच्या ताब्यात असून दिवंगत वडील मिनानाथ तारे हे आणीबाणी काळातील लोकतंत्र सेनानी होते. जमीन अद्याप सामायिकच असून सर्व वारसदारांची नोंदही सातबारावर झालेली नाही.शिवाय सदर मालमत्ता ग्रामसेवा सहकारी सोसायटी येथे तारण आहे.याच जमिनीबाबत न्यायालयात लिज पेन्डन्सी क्रमांक 4339/2023 दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
अशा परिस्थितीत प्रतिवादी असलेले उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कथितपणे बुलडाणा दुय्यम निबंधक यांच्याशी संगनमत करून मावसभाऊ महेंद्र नारायण राऊत यांच्या नावावर बेकायदेशीर खरेदीदस्त तयार करून नोंदणी घडवून आणल्याचा आरोप दिलेल्या पत्रात करण्यात आला आहे.हरकती असूनही मंडळ अधिकाऱ्यांनी फेरफार केला असल्याचाही दावा करण्यात आला आहे.तारे यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या निवेदनात हा प्रकार “सरळसरळ पदाचा दुरुपयोग व संगनमताने केलेली जमीन बळकावण्याची कारवाई”असल्याचा आरोप करत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.तसेच बेकायदेशीर खरेदीदस्त,फेरफार आणि सातबाराची नोंद तत्काळ रद्द करण्यात यावी,असेही नमूद केले आहे.आता महसूल खात्याची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात फेरफार देणारा बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे ज्यांची (डी ओपन) चौकशी सुरू असतांना शेकडो तक्रारी आयुक्त,जिल्हाधिकारी कार्यालयात असूनही त्यांनी पुन्हा डोंगर खंडाळा शेती प्रकरणात नियमबाह्य दिलेले फेरफार हे सिद्ध करून दाखविले की महसूल प्रकरणात मीच सर्वश्रेष्ठ असून माझ कोणी काहीच ‘वाकड’ करू शकत नाही ही तर आयुक्त अमरावती व जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी टेकाळे प्रकरणात का मौन बाळगले? की त्यांच्यावरही राजकीय दबाव आहे हे आम्ही पुढील सत्रात प्रकाशित करणारच आहोतच










