देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) चोरी-लुटमार होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यातल्या त्यात दरोडे टाकण्याचे धाडस करून सराईत गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले आहे.
रोख रकमेसह गाडीतील माल अज्ञात दरोडेखोरांनी लुटण्याची घटना देउळगाव राजा – सिंदखेडराजा ते जालना रोडवरील मोती तलाव जवळ रात्री 6 जुलैला घडली.
फिर्यादी सिध्देश्वर कडुबा राउत रा.सावरखेडा, ता.जाफ्राबाद, जि. जालना यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. देउळगाव राजा- सिंदखेडराजा ते जालना रोडवरील मोती तलाव जवळ फिर्यादी व सोबतचा चालक दिनेश अशोक बोराडे, रा. गोंधनखेडा, जाफ्राबाद असे दोघे त्यांचे वाहन टाटा 407 वाहन क्र MH 43-AD 7599 मध्ये जालना येथिल व्यापाऱ्यांचा वेग-वेगळा माल वाहनामध्ये भरुन जालना येथुन जाफ्राबाद येथे घेवुन जात दरम्यान तोंडाला रुमाल बांधलेल्या 4 दरोडेखोरांनी पांढऱ्या रंगाची स्विप्ट डिझायर फिर्यादीच्या वाहनाचे समोर आडवी लावली. जबदस्तीने चाकुचा व रॉडचा धाक दाखवुन एकाने फिर्यादीचे वाहन चालवुन इतरांनी फिर्यादीस लोखंडी रॉडने तोंडावर, डोळयावर, नाकावर, डावे हातावर व उजवे पायावर मारहाण केली. यावेळी फिर्यादीकडुन नगदी 5000 रु, oppo कंपनीचा A59 मोबाईल जबरीने काढुन घेतला. तसेच चालक दिनेश बोराडे यास पाठीवर व मानेवर मारहाण करुन त्यांचेकडुन नगदी.30,000 रू व Vivo कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. फिर्यादी व चालकाला घेउन सिंदखेडराजा हद्दीत नेऊन त्यांना धमक्या देण्यात आल्या. त्यांना 407 वाहनामध्ये बसण्यास सांगुन आज्ञात आरोपी गाडीमधुन उतरुन फरार झाले. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार संतोष महाले यांच्या मार्गदर्शनात पोउपनि भारत चिरडे यांचेकडे तपास देण्यात आला.