बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार धडाधड समोर येत असून, न्यू तिरुपती एजन्सीचे व्यापारी नितीन जयस्वाल यांना आलेल्या एका संशयास्पद फोनने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. रात्री अचानक आलेल्या फोनमध्ये समोरच्या व्यक्तीने जिजामाता स्टेडियमवर माल पाठवण्याची मागणी केली. विश्वास बसावा म्हणून बोलणाऱ्याने मी तिथे माणूस पाठवतो असे सांगत पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्याचे नाटक रचले.
नितीन जयस्वाल यांनी अकाउंट डिटेल्स दिल्यानंतर त्या भामट्याने चुकून तुमच्या खात्यात जास्त पैसे गेले आहेत असा बनाव केला. मात्र जयस्वाल यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ बँकेत संपर्क साधला. बँकेकडून स्पष्ट सांगण्यात आले की त्यांच्या खात्यात कोणताही पैसा जमा झालेला नाही. त्यानंतर फसवणूक करणारा सतत दोन वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत दबाव टाकू लागला.
जर ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती दिली असती, तर क्षणात खात्यातील सर्व रक्कम साफ झाली असती. सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.या घटनेनंतर व्यापारी नितीन जयस्वाल यांनी सर्व व्यापाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. ऑनलाईन व्यवहार करताना अतिशय सावध रहा, कोणालाही ओटीपी किंवा अकाउंटची गोपनीय माहिती देऊ नका. बुलढाण्यात सायबर फ्रॉड सक्रिय आहे











