spot_img
spot_img

💥BREAKING मनोज मेरतांच्या ‘जात प्रमाणपत्र घोटाळ्या’चा मोठा स्फोट! 23 कोटींची माया उघडीपणे?जातवैधता विक्रीचा कारभार? शिक्षणासाठी 1 लाख, नोकरीसाठी 15 लाखाचा उघड बाजार! ‘आमदारा’च्या आईचे पण नाव बुलढाण्यात खळबळ!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांच्यावरील स्फोटक आरोप समोर आला आहे. आरक्षण बचाव संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष राजेश फकीरा राठोड यांनी थेट मेरत यांच्यावर बोगस जात व जातवैधता प्रमाणपत्रांची सरळसरळ विक्री केल्याचा गंभीर आरोप करत राज्य सरकारसमोर मोठी मागणी ठेवली आहे.या घोटाळ्याला गळचेपी करण्यासाठी तात्काळ एसआयटी कमिटी स्थापन करा!

राठोड यांनी दावा केला की महाराष्ट्रातील हजारो बोगस प्रमाणपत्रांच्या मागे बुलढाणा-जालना-औरंगाबाद या तीन जिल्ह्यांतील जातपडताळणी समित्यांचे धागेदोरे आहेत. “बुलढाण्यात अनेक अधिकारी बोगस जातप्रमाणपत्र घेऊन बसले आहेत,” असा राठोड यांनी थेट आरोप करत मनोज मेरत आणि जि.प. सीईओ गुलाबराव खरात यांची नावे घेतली.याप्रकरणी राजकीय क्षेत्रातील नावेही समोर आली असून जयकुमार रावळ यांच्या आईंच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबतही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मेरत यांनी पूर्वी अकोला येथे उपायुक्त असताना जातपडताळणी प्रक्रियेत उघडपणे गैरव्यवहार केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिक्षणासाठी एक लाख, नोकरीसाठी १५ लाख इतक्या स्पष्ट दराने जातप्रमाणपत्र विक्री होत होती,असा आरोप करत राठोड यांनी धक्कादायक दावा केला की मनोज मेरत यांनी तब्बल 23 कोटी रुपयांची बेकायदेशीर माया जमवली आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राठोड यांनी ही भ्रष्ट साखळी मोडण्यासाठी राज्य सरकारने त्वरित एसआयटी स्थापन करून बोगस प्रमाणपत्रधारकांना बाहेर काढावे आणि खऱ्या विजा अप्रवर्गीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!