बुलडाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाणा शहरातील वार्ड क्र.१ येथील अण्णाभाऊ साठे नगर व रामदेवजी नगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा संताप अधिकच उफाळला आहे. शहर पोलीस स्टेशनला लागूनच आणि नागरी वस्तीच्या मध्यभागी सुरु असलेले श्री जि.बी. वारे यांचे देशी दारू दुकान तात्काळ बंद करून शहराबाहेर स्थलांतरित करण्याची जोरदार मागणी भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष करण अर्जुन बेंडवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बेंडवाल यांनी स्पष्ट केले की शालेय विद्यार्थ्यांचा, महिलांचा आणि नागरिकांचा सततचा त्रास दुर्लक्षून प्रशासनाने आजवर कोणतीही कारवाई न केल्याने लोकांच्या सुरक्षेला सरळ धोका निर्माण झाला आहे. दारू दुकान घरांच्या मध्यभागी, बाजाराच्या रस्त्यावर आणि पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून कसे चालू राहू शकते? हे प्रशासनाचे उघड अपयश आहे,असा थेट सवाल बेंडवाल यांनी उपस्थित केला.दरम्यान, चार दिवसांत दुकान शहराबाहेर हलवले नाही, तर नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यापासून ते मुंबईपर्यंत पदयात्रा व उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.










