spot_img
spot_img

रविकांत तूपकरांनी दिली अडीच लाख मतावर तृप्तीची ढेकर! -जिल्ह्यातील सहाही विधानसभा निवडणुक लढविणार! -महाराष्ट्रातही उमेदवार उभे करणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही अडीच लाख मते मिळाल्याच्या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी नेते रविकांत तूपकर यांनी आता बुलढाणा जिल्ह्यातील सहाही विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे टाळ्या घेत स्वागत केले.

आज गोलांडे लॉन्स येथे कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यावर आपली भूमिका जाहीर केली. शेतकरी हितासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना 6 विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवारी देऊ असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही अडीच लाख मते मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी नेते रविकांत तूपकर यांनी आता बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, जळगाव जामोद, सिंदखेडराजा, चिखली, मेहकर या विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर येणाऱ्या 14 तारखेला पुणे येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महाराष्ट्रात कुठे उमेदवार उभे करायचे ? लवकरच जाहीर करणार आहोत,असेही तूपकर म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!