spot_img
spot_img

💥BREAKING विहिरीतून बाहेर आला ‘मृत्यू’! बुलढाण्याच्या गुलाबचंदनगरात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून खळबळ!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा-मलकापूर महामार्गालगतच्या गुलाबचंद नगर परिसरात आज (7 डिसेंबर) दुपारी थरकाप उडवणारी घटना समोर आली. येथील बिनीश्याम अग्रवाल यांच्या शेतातील पडक्या विहिरीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून येताच परिसरात एकच खळबळ उडाली. तेथे लोकांनी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिस स्टेशनची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. विहिरीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस व स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. मात्र या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृत व्यक्तीची ओळख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे ही हत्या आहे का अपघात, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहे. अज्ञात मृतदेह सापडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!