बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शाळा सोडल्याचा दाखला देण्याकरिता सध्या शैक्षणिक विभागाची उदासीनता दिसून येत आहे. परंतु या विरुद्ध एन.एस.यु.आय.ने दंड थोपटत जिल्हा प्रशासनाला मागणी केली आहे.
सन 2024-2025चे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असून सातवा वर्ग पास दाहवा वर्ग पास विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी TC त्वरित मिळावी.
अशी मागणी बुलढाणा जिल्हा एन.एस.यु.आय.चे अध्यक्ष शैलेश खेडकर यांनी केली आहे. बुलडाणा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री.आकाळ यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की हायस्कूल मधील विद्यार्थी दहावी पास झाल्यावर यांना त्यांच्या मनानुसार पुढील ऍडमिशन घ्यावयाची असते मात्र बऱ्याच शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना तात्काळ TC देत नाही अडवणूक करतात जेणेकरून पुढील शिक्षण त्यांनी त्यांच्याकडेच घ्यावे. विद्यार्थ्यांची ही अडवणूक चुकीचे असून अशा शिक्षण संस्थांवर आपण कडक कारवाई करावी अशी मागणी बुलडाणा एन.एस.यु.आय.जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी त्यांच्यासोबत एन.एस.यु.आय.जिल्हा उपाध्यक्ष ऋषभ साळवे,एन.एस.यु.आय.शहर अध्यक्ष अमन चव्हाण, एन.एस.यु.आय. शहर उपाध्यक्ष सोमेश शेवाळे ,व सोमठाण्याचे गणेश सोळंकी, विजय जाधव ,निलेश झगडे, आदी उपस्थित होते.