चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि चिखली तालुक्यातील वळती येथील तेजस्वी युवा नेतृत्व पंजाबराव धनवे (वय 42) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने थोड्याच वेळापूर्वी अकस्मात निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कर्तृत्व, संघटन कौशल्य आणि लोकांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे धनवे यांची ओळख चिखलीतील आशादायी आणि प्रभावी युवा नेते अशी होती. पक्षाच्या बळकटीसाठी सतत मैदानात राहून काम करणारे हे कार्यकर्ते अचानक काळाच्या स्वाधीन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
मागील काही वर्षांत त्यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे ते चिखली तालुक्यातील उदयास येणारा नेता म्हणून ओळखले जात होते. मात्र, हा उगवता तारा काळाने अकाली हिरावून घेतल्याने राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त केले आहे.












