बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाणा शहरापासून अवघ्या 12 किलो मीटर अंतारावर असलेले डोंगरखंडाळा येथील 28 एकर वडिलोपार्जित सामायिक शेतीवरून तारे कुटुंबात जोरदार वादंग निर्माण झाला असून या प्रकरणात आता राजकीय हलकल्लोळ माजला आहे.तारे यांच्या नावावर असलेल्या सामायिक मालकीच्या या जमिनीत 23 पेक्षा अधिक वारसदार असतानाही केवळ आठ जणांनी नियमबाह्य व्यवहार करत 14 एकर जमीन बाजार मूल्य कोट्यवधी रुपयांना छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार महेंद्र राऊत यांच्याकडे विकल्याचा गंभीर आरोप तारे परिवाराने केला आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार महेंद्र राऊत हे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांचे मावस भाऊ असून,सत्ता व पदाच्या आडून हा व्यवहार करण्यात आल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.माझा या व्यवहाराशी संबंध नसल्याचे भंडारे यांनी मीडियाला माहिती दिली तारे यांनी त्या शेती प्रकरणाशी संबंध नसतांना ही बदनामी केल्याने दरम्यान,ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांनी उलट तारे विरुद्ध बदनामीची तक्रार नोंदवत गुन्हाही दाखल झाला होता. राजकीय दबावतंत्र वापरून सामान्य नागरिकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला,असा आरोप तारेसह स्थानिकांनी केला आहे.
व्यवहारातील कागदपत्रांची पडताळणी,कायदेशीर पूर्तता, वारसांना नोटीस,पेपर प्रकटण, स्वतंत्र सातबारा,सर्च रिपोर्ट, कर्जनिर्गत-या कोणत्याही प्रक्रियेचे पालन न करता जमीन खरेदी-विक्री झाल्याचे बोलले जाते. “अशा भानगडीच्या जमिनीचा व्यवहार कोणी साधा माणूस करत नाही; रिस्क घेण्यासाठी राजकीय पाठबळ लागतं,” अशी गावकऱ्यांची बोचरी प्रतिक्रिया समोर आली आहे.
यात आणखी धक्का म्हणजे याच भंडारे कुटुंबातील एक सदस्य आगामी जिल्हा परिषद निवडणूक त्याच सर्कलमधून लढवणार असल्याचे बोलल्या जात आहे. पीडित तारे परीवार यांची भंडारेवंर दडपशाहीचे आरोप आहेत, त्यांनाच मतदार किती साथ देतील? असा प्रश्न थेट ग्रामस्थांच्या मनात उभा ठाकला आहे.14 एक्कर शेती प्रकरण न्यायालयीन सुरू असून,आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार महेंद्र राऊत यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता ते कॉल का उचलत नाही?
हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
क्रमशः














