spot_img
spot_img

💥BREAKING बुलढाण्यात प्रभाग 15 मध्ये बोगस मतदानाचा थरार – दोन बोगस मतदार रंगेहाथ पकडले!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रयत्न उघडकीस आला असून, दोन बोगस मतदारांना प्रत्यक्ष मतदान करताना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण तीन जणांनी बोगस मतदानाचा प्रयत्न केल्याची खात्री झाली असून त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिसऱ्याचा शोध सुरू असून, या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तापलेले राजकीय वातावरण अधिकच तंग झाले असून, पोलिसांनीही अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. मतदान केंद्राबाहेर आणि आत पोलीस व सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्टवर असून, संशयितांवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.

बोगस मतदानाचा पर्दाफाश झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेची पवित्रता राखण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी कंबर कसली असून, अशा कृत्यांसाठी कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!