spot_img
spot_img

प्रभाग 5 मध्ये तापलेलं वातावरण; मोहित भंडारी आणि सौ. कल्याणी पैठणकर यांचा आक्रमक प्रचार शिगेला!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवडणुकीचे वातावरण अक्षरशः तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग 5-ब मधून उमेदवार मोहित संजय भंडारी आणि प्रभाग 5-अ महिला गटातून सौ. कल्याणी कुणाल पैठणकर यांनी आज प्रभागभर आक्रमक प्रचाराचा धडाका उडवत मतदारांशी थेट संवाद साधला.

प्रभाग क्रमांक 5 हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग असून आठवडी बाजार, जनता चौक, राम गल्ली, शनि गल्ली, भीमनगर, संभाजीनगर, पाठक गल्ली अशा दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश आहे. या विशाल प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजना करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

मोहित भंडारी यांनी रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांचे प्रलंबित प्रश्न आणि आठवडी बाजारात निर्माण होणारी गर्दी व वाहतूककोंडी यावर कायमस्वरूपी उपाय करण्याचे आश्वासन दिले. आठवडी बाजारात संपूर्ण शहरातून नागरिक येतात. शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था आणि स्वच्छ, सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आमची प्राथमिकता असेल, असे ते म्हणाले.

आपल्या कुटुंबाची जनसेवेची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी दिवंगत आजोबा माजी नगरसेवक शिवलालजी भंडारी आणि माजी नगरसेवक नरेंद्र भंडारी यांच्या कार्याचा उल्लेख करून, “आम्ही संघर्षातून वाढलेलो, सर्वसामान्य घरातील सुशिक्षित उमेदवार आहोत. प्रभाग 5 च्या सर्व नागरिकांनी आम्हाला एक संधी द्यावी,” असे आवाहन केले.

प्रभाग क्र 5 अ उमेदवार…
सौ कल्याणी कुणाल पैठणकर
सौ कल्याणी कुणाल पैठणकर यांच्या वतीने प्रभागातील जनता मायबापांना आवाहन करण्यात आले की येत्या निवडणूक मध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवार म्हणजेच एक नगराध्यक्ष लक्ष्मीताई दत्ता काकस आणि प्रभाग अ आणि ब मधील उमेदवार यांना प्रचंड मताने विजयी करा. खऱ्या अर्थाने प्रभागाचा हा विकास सांस्कृतिक आणि सामाजिक  रित्या झाला पाहिजे. त्याचबरोबर वार्डातल्या ज्या काही समस्या आहे तरुणांच्या समस्या नोकरीच्या समस्या बेरोजगारीच्या समस्या प्रभागातील वातावरण सुंदर करण्यासाठी आणि प्रभाग उज्वल करण्यासाठी समस्त मायबाप मतदारांना आपल्या या हक्काच्या उमेदवारांना मत देऊन विजयी करा तुमचं एक मत प्रभागाच्या विकासासाठी…

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!