चिखली (हॅलो बुलडाणा) नगरपरिषद निवडणुकीत जनतेचा मूड एकदम स्पष्ट झाला आहे.भयमुक्त, पारदर्शक आणि सुशासनाचे चिखली हवे! सत्तेच्या दडपशाहीला कंटाळलेल्या नागरिकांनी यंदा बदलाची गरज तीव्रतेने व्यक्त केली असून महाविकास आघाडीकडे झुकणारा जनतेचा स्पष्ट कल राजकीय समीकरणेच बदलून टाकत आहे. महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या नावाभोवती प्रचंड जनसमर्थनाची लाट निर्माण झाली आहे.
शहरातील कॉर्नर मीटिंग्स, घराघरातील चर्चा आणि छोट्या मोठ्या सभांमध्ये एकच आवाज घुमतोय भयमुक्त चिखली हवी! गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांना भोगावा लागलेला दबाव, राजकीय सूडाची सावली आणि ठप्प विकासामुळे मतदारांचा विश्वास महायुतीवरून पूर्णपणे उतरल्याचे स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडीने दिलेल्या पारदर्शकतेच्या हमीने, सूडमुक्त कारभाराच्या आश्वासनाने आणि सर्वसमावेशक विकासाच्या भूमिकेने मतदारांची मने जिंकली आहेत. महिला, तरुण, व्यापारी, कष्टकरी सर्वच घटकांकडून आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
दरम्यान, भाजप उमेदवार पंडित देशमुख यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे उमेदवार निलेश गावंडे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेऊनही जनतेवर काहीच परिणाम झाला नाही. मोठ्या सभा, मोठी भाषणे… पण जमीनिदारी हुकमी ठरते आणि तिथे महायुतीचा पत्ता साफ कोसळताना दिसतोय.














