बुलडाणा (हॅलो बुलडाणा) प्रभाग क्रमांक 5-ब मधून उमेदवारी अर्ज भरलेल्या हिंदुत्ववादी गोरक्षक गजेंद्रसिंग अहिर यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करताच राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अहिर यांनी भाजपवर पूर्ण विश्वास ठेवत भाजप नेते तसेच आमदार श्वेताताई महाले व जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष झेंडा हाती घेतला.
अहिर यांच्या प्रवेशाने प्रभाग 5-ब मधील निवडणूक अधिक चुरशीची होण्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिकांमध्ये त्यांची कामसू, आक्रमक आणि तडफदार कार्यकर्त्याची छबी असून, गोरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. याच मजबूत जनाधारामुळे त्यांच्या प्रवेशाने विरोधकांच्या गणितात मोठी खळबळ माजल्याचे दिसून येत आहे.भाजपमध्ये दाखल होताना गजेंद्रसिंग अहिर यांनी मतदारांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, हिंदुत्व आणि विकासाच्या राजकारणावर माझा विश्वास आहे. पक्षाच्या धोरणांबरोबरच श्वेताताई महाले व विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण भरोसा असल्यामुळेच मी भाजपमध्ये आलो.














