चिखली (हॅलो बुलडाणा) नगरपालिका निवडणुकीचा तापलेला माहोल आणखी चुरशीचा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस–शिवसेना युतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्राचार्य डॉ.निलेश गावंडे यांना थेट पाठबळ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, दि. २६ नोव्हेंबर रोजी चिखलीत दाखल होत आहेत. शहरातील राजा टॉवर परिसरात होणारी परिवर्तन सभा युतीसाठी टर्निंग पॉइंट ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.राष्ट्रवादी-शिवसेना युतीने चिखली निवडणुकीत आक्रमक मोड सुरू केला असून संघटनात्मक तयारी सर्वोच्च बिंदूवर पोचली आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाला शिवसेनेच्या धनुष्यबाणाची जोड मिळाल्याने युतीची ताकद दुणावली आहे. या तुफानी बळावर युतीने भाजप–काँग्रेससमोर भक्कम, धारदार आणि निर्णायक आव्हान उभे केले आहे.
युतीचे प्रमुख चेहरा डॉ. निलेश गावंडे हे उच्चशिक्षित, सुसंस्कृत, सामाजिक भान असलेले नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांचा दमदार जनसंपर्क, सातत्यपूर्ण समाजकार्य आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे त्यांच्याबाबत मतदारांत प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. गावंडे यांच्या प्रवेशानंतर प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये खळबळ उडाली असून उद्याची अजितदादांची सभा त्यांना आणखी घाम फोडणारी ठरणार, अशी चर्चा सर्वत्र आहे.अजितदादा पवार आपल्या बिनधास्त, थेट आणि विकासाच्या भाषणशैलीसाठी प्रसिद्ध. उद्या ते चिखलीकरांसमोर शहर विकासाची धुरा गावंडे यांच्या खांद्यावर द्या असा सरळ संदेश देणार असल्याचे खात्रीने सांगितले जात आहे.दुपारी ३ वाजता राजा टॉवरच्या मैदानातील ही सभा भव्य होणार असून हजारो नागरिक, दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात तयारीला लागले आहेत.














