बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील जयस्तंभ चौक, अर्बन बँकेसमोरील रस्त्यालगत अंदाजे एक 60 ते 65 वर्षे वयाचे पुरुषाचे प्रेत आढळून आले आहे. परंतु या अनोळखी प्रेताची ओळख पोलिसांना देखील अद्याप झाली नाही.
विशेषता पोलीस काय करतात? अनोळखी व्यक्तीचे प्रेत रुग्णालयात हलवितात. तसे या प्रेताला देखील पुढील प्रक्रिया कामी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे ॲम्बुलन्स मध्ये पाठवण्यात आले. शिवाय पोलिसांनी नेहमीप्रमाणे आवाहन केले की, प्रेत ओळखीचे असल्यास बुलढाणा शहर पोलीस स्टेशन व जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे संपर्क करावा अथवा माहिती द्यावी.. हा पोलिसांचा नियम आहे. परंतु पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करत नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. म्हणायचे असे होते की जिथे थोडाफार लाभ होतो ते प्रकरण आधी हाताळले जाते. परंतु आढळलेल्या प्रेताचे निश्चितच कोणीतरी नातेवाईक असतीलच! त्यांना याबाबत ज्ञात सुद्धा नाही. त्यामुळे ‘हॅलो बुलढाणा’ असे आवाहन करते की, वरील फोटो पाहून कुणाला माहिती असल्यास त्यांनी ‘हॅलो बुलढाणाशी’ संपर्क करावा..