रायपूर (हॅलो बुलढाणा/ सचिन जयस्वाल) रायपूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करत पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आज ग्राम मातला शिवारात धाड टाकून किरण वामन तायडे (वय 42, रा. मातला) हा इसम गावठी हातभट्टीची दारू गाळताना पोलिसांच्या हाताशी लागला. गावठी दारूचा व्यवसाय रोखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई युद्धपातळीवर राबवली.
तायडे याच्या ताब्यातून तब्बल 30 लिटर गावठी दारू (किंमत 3,000 रुपये) तसेच 300 लिटर मोहसडवा (किंमत 6,000 रुपये) असा एकूण 9,000 रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिसरात वाढत चाललेल्या हातभट्टीच्या विक्रीला चाप बसवण्यासाठी पोलिसांचे पथक जणू झेप घेऊनच कारवाईला सरसावले.ही कारवाई ठाणेदार निलेश सोळंके, एचसी दशरथ शितोळे, कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे व लिंबाजी राठोड यांनी अचूक माहितीच्या आधारे केली. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.














