बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘बाबा तिथेच दाबा’ असे वृत्त’हॅलो बुलढाणा’ने प्रकाशित केल्यावर घाटनांद्रा येथील शिवा महाराज यांना तात्काळ अटक करण्यात आली. हा इम्पॅक्ट चांगलाच गाजला. आता सैलानी येथील एका भोंदू बाबाला मनोरुग्णाची लूट करीत असल्याने त्याला जेरबंद करण्यात आले.रायपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी असे आरोपीचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मनोरुग्णांची पिळवणूक होत आहे. काही घटना पडद्यामागे आहेत तर काही घटना समोर येत आहेत. याप्रकरणी पोलिसांना सीआयडी प्रमाणे चौकशी करावी लागेल. खरे तर,
भोंदु बाबांचा मेकप आणि उच्चारातील शुध्दता याने अंधभक्तांवर प्रभाव टाकल्या जातो.भोंदु बाबा हे समस्याग्रस्त भक्तांच्या चेह-यावरून आणि डोळ्यांवरून ब-यापैकी आढावा घेतात.काहि बाबांच्या भेटिच्या अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात..भेटिपुर्वी या बाबांचे दलाल अशा अंध भक्तांची संपुर्ण माहिती अगदि इत्थंभूत बाबाला कळवतात..अंधभक्तांना तिथे नेणारे दलालच भोंदु बाबाची ख्याती अंधभक्ताना सांगतात व बाबा किती संतगुणाचा आहे हे पटवतात…हे दलाल खोटे अनुभव सांगुन स्वतः बाबाचा भक्त असल्याचे सांगुन अंधभक्तांच्या समस्या व माहिती शोधुन काढतात..अंध भक्तांची माहिती बाबांच्या तोंडून बाहेर पडु लागल्यावर अंधभक्त कोणताही विचार न करता भोंदु बाबाला शरण जातो.याचा फायदा घेत भोंदु बाबा व त्याचे अनुयायी अनेक स्वरूपात सुटतात. जिल्ह्यात भोंदू बाबाचे चांगलेच प्रस्थ माजले आहे. मनोरुग्णांचेही शोषण होत आहे. दरम्यान रायपुर पोलीस स्टेशन अंतर्गत सुमनबाई जाधव रा. येनोली तांडा जिंतूर जिल्हा परभणी यांनी फिर्याद केल्यावरून आरोपी भोंदू बाबाला अटक करण्यात आली.
प्रकरण अशा प्रकारे आहे की, आरोपी याने फिर्यादी यांचे नातु विकी पुडंलिक जाधव यांचेवर सैलानी बाबा दर्गा येथे जंतर मंतर करून त्याचे आंगावर लिंबु कापून उतरून घेवून पैशाची मागणी करून भिती दाखविली. ही एक फसवणुक आहे. आरोपीने नातावाचे हात पायाला बेड्या टाकून
साखळी ने बांधून अघोरी उपचार करून पिळवणुक केली. त्यामुळे पोलिसांनी भोंदू बाबा विरोधात जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास ठाणेदार राजपुत करीत आहेत. मनोरुग्णांची पिळवणूक होत असेल तर तक्रार करा असे, आवाहनही त्यांनी केले आहे.