खामगाव (हॅलो बुलढाणा) खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तासंघर्षात आज एक धक्कादायक वळण आलं आहे! महिला संचालिका वैशाली मुजुमले यांचे त्यांच्या राहत्या घरातून अपहरण झाल्याची सनसनाटी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील आणि स्वप्निल ठाकरे यांच्यावर थेट किडनॅपिंगचे आरोप करण्यात आले आहेत!
संचालिका मुजुमले यांचे पती यांनी पोलिसात तक्रार दाखल करत संताप व्यक्त केला आहे. “माझ्या पत्नीला शेगाव येथील ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरी डांबून ठेवण्यात आले आहे, तिला तातडीने मुक्त करा!” असा टाहो त्यांनी दिला. या घटनेमुळे संपूर्ण खामगाव आणि शेगाव तालुका राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिस विभागही अलर्ट झाला असून अप्पर पोलिस अधीक्षकांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे. महिला संचालिकेची सुटका करण्यासाठी पोलीस पथक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहे.राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईत महिला संचालिकेच्या अपहरणापर्यंत मामला पोहोचल्याने बाजार समितीचे वातावरण तापले आहे. या घटनेमुळे काँग्रेस नेत्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधकांनी यावर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.














