spot_img
spot_img

मुंबईत बँकेत कार्यरत मलकापूरची CA खुशबू परयाणीचा भीषण मृत्यू – १२ फेब्रुवारीला होणार होतं लग्न, पण काळाने घेतला निर्दयी खेळ!

मुंबई (हॅलो बुलडाणा) मलकापूरचा एक उज्ज्वल तारा अकाली विझला! केवळ काही दिवसांवर लग्नाची स्वप्ने रंगवणाऱ्या २७ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट खुशबू परयाणी हिचा मुंबईतील बीकेसी परिसरात झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. १२ फेब्रुवारी रोजी तिचं लग्न ठरलेलं होतं, घरात आनंदोत्सवाचं वातावरण होतं, पण एका क्षणात सर्वकाही उद्ध्वस्त झालं!

घटनेनुसार, ६ नोव्हेंबरच्या सकाळी खुशबू आयसीआयसीआय बँकेच्या बीकेसी शाखेत कामावर जात असताना, एशियन हार्ट हॉस्पिटलजवळ रस्ता ओलांडताना भरधाव पाण्याच्या टँकरने तिला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की खुशबूला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

खुशबू परयाणी ही मलकापूरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि समाजसेवक कुटुंबातील कन्या होती.दीपक परयाणी यांची मुलगी आणि ताराचंद परयाणी यांच्या पुतणी. आयुष्यात स्थिर होऊन संसाराची नवी स्वप्ने उभारण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, काळाने तिचा निर्दयी खेळ केला.या घटनेने मलकापूर शहरात शोककळा पसरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!