spot_img
spot_img

💥EXCLUSIVE बुलढाण्यात आयटीआर बॉम्ब! १६३३ पोलिसांवर नोटिसा – CA विष्णू मुळे घोटाळ्याच्या केंद्रस्थानी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील पोलिस विभागात अभूतपूर्व खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. तब्बल १६३३ पोलिस कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या असून, चुकीच्या पद्धतीने भरलेल्या आयकर विवरणपत्रांमुळे (ITR) या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे स्थानिक चार्टर्ड अकाउंटंट बोगस (CA) विष्णू मुळे यांच्यापर्यंत पोहोचले असल्याचा प्राथमिक तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

सदर प्रकरणात नागपूर येथील सहाय्यक आयकर आयुक्त (INV) यांनी २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्र जारी करत विष्णू मुळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची ITR चुकीच्या पद्धतीने भरल्याची कबुली दिली असल्याचे नमूद केले आहे. मुळे यांनी अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे विवरणपत्र स्वतःच्या संगणकावरून सादर केले, आणि बेकायदेशीर कपाती दाखवून त्यांना चुकीचा कर लाभ मिळवून दिला. आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली असून, ही एक साखळी स्वरूपातील फसवणूक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामध्ये काही अधिकाऱ्यांनी २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ या सलग चार वर्षांचे आयटीआर एकाच पद्धतीने दाखल केले असल्याचे आढळले. म्हणजेच, चुकीची पद्धत ही सिस्टेमॅटिक आणि योजनाबद्ध रितीने राबवली गेली, असे आयकर विभागाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे. या प्रकरणात काही चार्टर्ड अकाउंटंट्स आणि मुळे यांच्यातील संगनमताची शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे.

बुलढाणा पोलिस अधीक्षक कार्यालयाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या वायरलेस संदेशानुसार, संबंधित सर्व पोलिस अधिकाऱ्यांना १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुधारित आणि योग्य आयटीआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयकर विभागाने इशारा दिला आहे की — “निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर पुढील दंडात्मक कारवाई केली जाईल.”

या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा पोलिस दलात मोठी अस्वस्थता पसरली असून, आयटीआर चुकीने भरल्यामुळे सेवा नोंदीवर परिणाम होण्याची भीती अनेक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. नागरिक आणि करदातेही या घोटाळ्याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत, कारण सरकारी कर्मचाऱ्यांनीच कायद्याची पळवाट शोधण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चुकीला माफी नाही – एसपी निलेश तांबे

दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे चांगलेच गंभीर झाले असून त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी उपरोक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले आयटीआर तपासून त्यामध्ये चुका असल्यास सुधारित विवरणपत्र तात्काळ दाखल करावे करण्याचे निर्देश दिले आहे. सोबतच बनावट सवलती घेणारे कर्मचारी व ते तयार करणारे सल्लागार यांना समान जबाबदार धरत ज्या कर्मचाऱ्याला आयकर विभागाकडून दंड किंवा नोटीस मिळेल, त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचा गंभीर इशारा देखील दिला आहे, हे विशेष!

सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोग्य विभागातही जवळपास 35 जणांना येत्या काही दिवसात नोटीस मिळणार

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!