spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! मेहकरमध्ये ‘गारोळे वादळ’! शहरभर एकाच नावाची चर्चा? कोण आहेत किशोर गारोळे?

मेहकर (हॅलो बुलडाणा) आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेहकर शहरात एकच नाव घुमत आहे.किशोर गारोळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, प्रत्येकाच्या ओठांवर गारोळेंचं नाव आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख आणि कर्तव्यदक्ष आमदार सिद्धार्थ खरात यांचे कट्टर समर्थक असलेले किशोर गारोळे हे नाव आता लोकांच्या मनावर कोरलं गेलं आहे.

रात्री-बेरात्री मदतीसाठी हजर राहणारा, दुःखात खांदा देणारा आणि आनंदात सहभागी होणारा असा हा दिलदार नेता मेहकरकरांच्या मनात घर करून बसला आहे. राजकारण कमी आणि समाजकारण जास्त, हेच त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य. गरीब, शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक सर्वांच्या प्रश्नांसाठी गारोळे धावून जातात. धर्म, जाती, पक्षभेद न बाळगता सर्व समाजात त्यांचा प्रभाव निर्माण झाला आहे.

सुशिक्षित आणि उच्चशिक्षित असलेले किशोर गारोळे यंदा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरणार आहेत. आणि मेहकरच्या गल्लीपासून चौकापर्यंत, हाच सूर ऐकू येतो.या वेळी किशोर गारोळेंना नगराध्यक्ष बनवायलाच हवं! त्यांच्या कार्यामुळेच लोकांमध्ये विश्वासाचं बंध जुळलं आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!