spot_img
spot_img

‘लक्ष्मीभेट’ महागात पडली! – बुलढाण्यात लाचखोर ग्रामसेवक अँटी करप्शन च्या जाळ्यात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘लक्ष्मीभेट’ स्वीकारण्याची लालसा दिवसागणिक वाढत असून,आज एका बुलढाण्यातील ग्रामसेवकाला 20 हजारांची लाच घेतांना अँटी करप्शन पथकाने रंगेहात पकडले आहे. राजेंद्र वास्कर रा. दाभा ता. मोताळा,असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार, राजेंद्र रघुनाथ वास्कर, (वय 50 वर्ष) पद ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) रा. ग्रामपंचायत दाभा ता. मोताळा, वर्ग-3 रा. जिजाऊ कॉलनी, हाजी
मलंग दर्गाच्या पाठीमागे, ता. जि. बुलढाणा याने बुलढाणा तहसिल कार्यालय आवारामध्ये 7 नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांची व त्यांचे मयत बहीण, भाऊ यांची ग्राम नाईकनगर
ग्रामपंचायत दाभा येथे असलेल्या दोन्ही जागा तकारदार यांचे दोन्ही मुलाच्या नावे करुन गाव नमुना 8-अ वर नोंद करुन 8 अ उतारा देण्यासाठी दोन्ही कामाचे मिळुन 28 हजार रूपये लोकसेवक राजेंद्र वास्कर, ग्रामसेवक हे लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागकाडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आज 7 नोव्हेंबरला लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत
करण्यात आली होती.

त्यामध्ये लोकसेवक राजेंद्र वास्कर, ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे नमुना 8-अ मध्ये नाव नोंदविण्यासाठी व 8 अ उतारा देण्यासाठी तडजोडअंती 20 हजार रुपये लाच मागणी करुन लाचेची रक्कम आजच घेवुन येण्यास सांगीतल्या वरून आज रोजी तहसिल कार्यालय, बुलढाणा येथील आवारामध्ये सापळा कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांचेकडून 20 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना राजेंद्र वास्कर यांना रंगेहात पकडण्यात आले. राजेंद्र वास्कर यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!