देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) फिर्यादी महिलेचा पाठलाग करून नेहमीच वाईट नजर ठेवणाऱ्यासह 5 आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून महिलेच्या वडिलांनाही शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान आरोपी विरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी विरोधात अपनं-267/2024 कलम74,78,333, 189(2), 190, 351(2), 352 बी एन एस.सहकलम 3(1) (w) (i) (ii), 3(i)(r)(s) अजाजप्रअधि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
नौशादखा शमशेरखॉ पठाण, शेख असद, शेख जावेद शेख समद, मोहसीनखों पठाण, शेख शाबीर शेख शाहबाज सर्व रा. संजयनगर, देऊळगाव राजा असे आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रानुसार, फिर्यादी व आरोपी हे लहानपणापासुन एकमेकांना ओळखतात. दोन महिन्यापासून एकाच नगरात राहतात. येथेच राहणारा आरोपी नौशादखा शमशेर खॉ पठाण हा वाइट उददेशाने नेहमी फिर्यादीचा पाठलाग करीत असतो. दरम्यान फिर्यादीचा मुलगा व फिर्यादी असे जेवण करून टि व्ही पाहत असताना, नौशादखा पठाण म्हणाला की, तु तुझया वडीलांना व भावाला बोलावून घे.. ते काय करतील मी बघुन घेतो. ‘तू पार्दडी जात की है, तु अध्यक्ष पद लेके जादा भारी बन गई क्या? तु जादा माजगइ है क्या मेरे सामने नाक लगानेकी औकात नहीं है’..असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ केली. तेव्हा फिर्यादीचे वडील वडील घरी आले’ तेव्हा आरोपी नौशादखा पठाण याने त्याचे मित्र आरोपी शेख असद, शेख जावेद समद, मोहसीनखों पठाण, शेख शाबीर शेख शाहबाज यांना फोन लावुन बोलावुन घेतले. या आरोपींनी फिर्यादीच्या वडीलांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. शिवाय इथे कसे राहता अशी धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.