बुलढाणा (हॅलो बुलडाणा) डोंगर खंडाळा १४ एकर शेतीप्रकरणावरून तापलेल्या वादाला नवी कलाटणी मिळाली आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र प्रभाकर तारे यांनी मीडिया समोर थेट सांगितले की,आमच्या वाट्याची १४ एकर जमीन बळकावण्याचा डाव राहुल तारे यांनी आखला होता. त्यांनी स्पष्ट केले की,२८ एकर शेतीपैकी १४ एकर जमीन त्यांच्या वाट्याची होती आणि ती जमीन त्यांनी कायदेशीर पद्धतीने महेंद्र राऊत यांना विकली आहे.राजेंद्र प्रभाकर तारे यांनी सांगितले की, या प्रकरणात ओएसडी भंडारे यांचे नाव विनाकारण खेचले जात असून त्यांचा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही. आम्ही वयोवृद्ध असल्याने आम्हाला पुणे ते बुलडाणा प्रवास होत नसल्याने ती जमीन विकणे हा आमचा हक्क आहे.आमच्या वाट्याची जमीन आम्ही विकली, त्यात गैर काय? असा थेट सवाल राजेंद्र प्रभाकर तारे सह इतर यांनी मीडिया समोर उपस्थित केला.







Hellobuldana





