spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! चिखलीत पुन्हा एकदा ‘शेटे’ लाट! नगराध्यक्षपदासाठी सुहास शेटे यांना जनतेचा जबरदस्त पाठिंबा

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपमधील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे माजी नगराध्यक्ष सुहास रामकृष्ण शेटे! त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास, लोकाभिमुख निर्णय आणि कार्यकर्त्यांशी असलेला दृढ संवाद यामुळे शहरात पुन्हा सुहास शेटेच हवेत अशी जोरदार लाट उठली आहे.

शेटे यांच्या कार्यकाळात चिखलीत अनेक मूलभूत सुविधा उभारल्या गेल्या. शहराच्या विकासाचा वेग वाढवणारे प्रकल्प राबवून त्यांनी सामान्य नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. पक्षाच्या तळागाळापासून ते सामान्य मतदारांपर्यंत एकच चर्चा विकास हवा असेल, तर शेटे हवेत! अशी जनभावना निर्माण झाली आहे.राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि विकासाभिमुख दृष्टी या तिन्ही गुणांचा संगम असलेले शेटे नगराध्यक्षपदासाठी सर्वात मजबूत दावेदार म्हणून समोर आले आहेत. भाजप नेतृत्वाने या जनतेच्या लाटेची योग्य दखल घेतली, तर चिखली नगरपालिकेत पुन्हा विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!