बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भाजपाला धक्का देत शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केलेले अनंता शिंदे आता त्यांच्या कृत्यामुळे ‘बॅकफूट’वर आले आहेत. राजकीय रंगमंचावर प्रवेश करताच त्यांनी माफीचा सूर लावला आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा दिसत होता, ज्यावर आमदार श्वेताताई महाले व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली.त्यावर अनंता शिंदे म्हणाले. “मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची माफी मागतो. या प्रकरणात भाजपचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही.भाजप हा सच्च्या, एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जे माझ्यासोबत घडलं, ती वस्तुस्थिती मी मांडली.”
मात्र हा पश्चात्ताप की राजकीय नाटक, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्षांतर करून जनतेत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न की दबावाखाली दिलेली माफी? भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी आता थेट प्रश्न विचारले.विश्वासघात करून पुन्हा माफी? हे जनतेला मान्य नाही! राजकारणातल्या या नाट्यमय कलाटणीने बुलडाणा शहरात राजकीय तापमान चढले असून आगामी दिवसात या प्रकरणावर आणखी खळबळ उडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.










