चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे 5 नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. स्वतःच्या आई-वडिलांची निर्घृण कुराडीने हत्या करून मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये सुभाष डीगंबर डुकरे (75), त्यांची पत्नी लता डुकरे (65) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (42) यांचा समावेश आहे. हे तिघेही सावरगाव डुकरेचे रहिवासी होते.
ही घटना इतकी भयावह आहे की गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकं कोणत्या कारणावरून विशालने आई-वडिलांचा खून केला आणि त्यानंतर स्वतःचेही जीवन संपवलं, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद की मानसिक नैराश्य? यावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. घराला संपूर्णपणे सील करण्यात आले असून पंचनामा सुरू आहे. तिन्ही मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे हलविण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकार सुधीर पाटील चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे दाखल














