बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात एवढी भाईगिरी वाढली की,थेट जिवंत काडतूसह देशी कट्टे बुलढाण्यात पोहोचत आहे. परंतु पोलीस दल काही कमी नाही, ‘कानून के हाथ लंबे होते’ त्यामुळे तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी पवन वासुदेव कोकाटे (वय 34) रा. नांदेड याला वरवट बकाल येथे जेरबंद करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अमोल गायकवाड अपर अधीक्षक , श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांचे आदेशाने 4 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन तामगाव हद्दीत कलम 3, 25, आर्म ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली. तामगाव पोलीस ठाण्यात . कलम 3,25 . भाहका सहकलम 123,135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पवन वासुदेव कोकाटे याने देशी बनावटीचे दोन कट्टे व चार जिवंत काडतुस बाळगल्याने त्याच्याकडून एकूण 84000 हजारांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई PSI पंकज सपकाळे,Hc एजाज खान,Pc अमोल ,PC अजीस परसुवाले,PC शिवानंद हेलगे यांनी केली.







Hellobuldana





