देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) येथील त्र्यंबक नगर येथील विजय डोके यांचे किराणा दुकान चोरट्याने मध्यरात्री फोडल्याची घटना घडली आहे. परिणामी पोलीस पेट्रोलिंग नियमित करण्यात येण्याची मागणी जोर धरू लागली.
फिर्यादी विजय डोके हा त्याचे त्रंबकनगर मधील किराणा दुकान बंद करून घरी गेले व पत्नी सकाळी दुकान उघडण्यास गेली असता दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. अज्ञात चोरट्याने दुकाणातील रोख रक्कम व किराणा माल असा एकुण 78,100 रुपये किंमतीचा माल चोरून नेला, अश्या आशयाची तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गवई करीत आहे.