बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेती अवजारे चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अंढेरा हद्दीतून एलसीबीच्या पथकाने काल 31 ऑक्टोंबरला जेरबंद केले आहे.अंढेरा हद्दीत फिर्यादी पवन शिवदास चेके यांनी त्यांच्या मालकीची 75 हजार रुपयांच्या किंमतीची ट्रॉली चोरी झाल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेच फिर्यादी विकास संपत चेके रा. सरंबा यांचे 65 हजार किंमतीचे रोटावेटर चोरी गेल्याची तक्रार दाखल होती. दरम्यान गुप्त माहीतीवरून एलसीबी पथकाने आरोपींचा शोध घेतला. पोलीसांनी आरोपी गणेश आत्माराम वायाळ (वय 38) रा.सावरखेडा, ता.जाफराबाद जि. जालना याच्याकडून 75 हजाराची ट्रॉली चोरीसाठी गुन्ह्यात वापरलेला 50,000 रुपये किमतीचा ट्रॅकर जप्त केला आहे. तर आरोपी सुरेश शेवत्रे (वय 33) रा. ब्रम्हपूरी ता. जाफराबाद जि. जालना याचेकडून 65,000 रुपये किमतीचा सोनालिका चॅलेंजर रोटावेटर जप्त केला आहे. दोन्ही गुन्ह्यातील एकुण 6,90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात एएसआय ओम प्रकाश सावळे, एचसी दिगंबर कपाटे,वनिता शिंगणे, कैलास ठोंबरे, दीपक वायाळ,मनोज खरडे या पथकाने केली आहे.














