spot_img
spot_img

रिल बनवितांना युवकाचा रेल्वेने कटून मृत्यू! आळसणा शिवारातील रेल्वे रूळावरील घटना!

शेगाव (हॅलो बुलढाणा) रेल्वे लाईनवर उभे राहून रिल बनवतांना एका युवकाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 4 वाजता सुमारास घडली. मृतकाचे नाव शे.नदीम शे.रफिक असून तो खामगाव तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी असल्याचे समजते. तसेच रिल बनवितांना त्याचेसोबत असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृतक शे.नदीम शे.रफिक हा आज दुपारी तालुक्यातील आळसणा गावात लग्नाच्या रिसेप्शनच्या कार्यक्रमात आला होता. त्यावेळी दुपारी 4 वाजता सुमारास त्याला व त्याच्या मित्राला आळसणा गावालगत असलेल्या रेल्वेलाईनवर रिल बनविण्याचा मोह सुटला आणि त्ो रिल बनविण्यासाठी रेल्वेलाईनवर पोहोचले. दरम्यान रिल बनविण्यात मग्न असताना व कानात हेडफोन लावलेले असल्याने रेल्वे आल्याचे शे.नदीमला कळले नाही आणि तो रेल्वेच्या खाली आला. ज्यामुळे त्याला आपल्या प्राणास मुकावे लागले. दुसरीकडे रिल बनवितांना हजर असलेला नदीमचा मित्र सुध्दा गंभीर जखमी झाला असून त्याचेवर शेगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती शेगाव ग्रामिण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शे.नदीमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेगाव येथील शासकीय रूग्णालयात आणला होता. या दुर्दैवी घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच समाजमन सुन्न झाले असून नदीमच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!