spot_img
spot_img

बुलढाण्यात भगवान श्री सहस्त्रबाहू यांची जयंती मोठ्या हर्षोत्सवात साजरी! – जयस्वाल समाज बांधवांचा उत्साह शिगेला!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात प्रथमच जयस्वाल युवा मंच तथा अखिल भारतीय जयस्वाल सर्व वर्गीय महासभा बुलढाणाच्याव तीने भगवान श्री सहस्त्रबाहू यांची जयंती मोठ्या हर्षोत्सवात साजरी करण्यात आली आहे.

एका आख्यायिके नुसार, प्राचीन काळात महिष्मती (वर्तमान महेश्वर) नगरचे राजा कार्तवीर्य अर्जुन होते. त्यांनी भगवान विष्णुचा अवतार दत्तात्रेयला प्रसन्न करून 1 हजार भुजांचे वरदान मागितले होते. तेव्हा पासून त्यांचे नाव सहस्त्रबाहु अर्जुन पडले. त्यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात पार पडली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बजरंगलाल जयस्वाल होते. यावेळी बुलढाणा जयस्वाल समाजाचे अध्यक्ष अशोकलाल जयस्वाल, सहस्त्रार्जुन अधिवक्ता संघाचे राष्ट्रीय सचिव ॲड. राजेश
जयस्वाल,अखिल भारतीय सर्ववर्गीय महासभाचे राष्ट्रीय कार्यकारी सचिव प्रशांत जयस्वाल,
जयस्वाल युवा क्लबचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व बुलढाणा जयस्वाल युवा मंचचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांची उपस्थिती होती. मंच द्वारा श्री भगवान सहस्त्रबाहु यांच्या जीवन चरित्रावर यावेळी मान्यवरांनी प्रकाश टाकला. समाज बांधवांकडून सहस्त्रबाहु अर्जुन यांची महाआरती करण्यात आली.दरम्यान अखिल भारतीय जयस्वाल सर्ववर्गीय महासभेच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सुत्र संचालन डॉ. गजानन जयस्वाल यांनी तर आभार सुरेंद्र जयस्वाल यांनी मानले. अल्पोपहाराची व्यवस्था सुरेंद्र जयस्वाल यांनी केली होती. नितीन जयस्वाल, रुपेश जयस्वाल, मयूर जयस्वाल तथा समाजबांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!