spot_img
spot_img

💥BREAKING पाळणाघरच्या हॉस्टेलमध्ये तुफान राडा! – विद्यार्थिनीला वॉर्डनकडून बेदम मारहाण; संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहरातील पाळणाघर परिसरात असलेल्या डॉक्टर चवरे यांच्या हॉस्टेलमध्ये आज सकाळी भीषण प्रकार घडला! एका विद्यार्थिनीला फक्त “माझे डिपॉझिट परत द्या” एवढेच सांगितल्यामुळे वॉर्डन महिलेने तिच्यावर अक्षरशः तुटून पडत बेदम मारहाण केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्ह्यातील ही विद्यार्थिनी पूर्वी या हॉस्टेलमध्ये राहत होती. सध्या ती पुन्हा बुलढाण्यात पेपरसाठी आली होती आणि तीन दिवसांसाठी हॉस्टेलमध्ये थांबली होती. तिचे सांगणे आहे की, दहा दिवसांचे डिपॉझिट रक्कम हॉस्टेलकडे असल्याने ती परत मागितली, पण त्यावरून वॉर्डन संतापली आणि काडीने बेदम मारहाण केली.या मारहाणीमुळे विद्यार्थिनी घाबरून रडत बाहेर पडली, आणि घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. काही वेळातच हॉस्टेलसमोर नागरिकांची मोठी गर्दी जमली. संतप्त नागरिकांनी पीडित मुलीच्या बाजूने घोषणाबाजी करत तिला बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

सदर प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांकडे वॉर्डनविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाला मागणी केली आहे की, अशा निर्दयी आणि विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या वॉर्डनवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!