चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन वेगवेगळ्या दुकानांमधून हजारोंची रोकड आणि DVR कॅमेरे लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे, या चोरीमुळे शहरातील व्यापारी वर्गामध्ये मोठी चिंता आणि अस्ब्थता पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भीष्मा गुरूदासानी यांच्या ‘जनता किराणा स्टोअर मधून तब्बल २२ ते २३ हजार रुपयांची रोकड रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तसेच श्री गुरुदासानी यांच्या शीतल कलेक्शन कपड्यांच्या दुकानातून ५ ते ७ हजार रुपये आणि DVR कॅमेरा चोरीस गेला आहे. ही घटना पहाटे सुमारास चार ते पाच वाजेच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. चोरट्यांनी दुकानांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला अणि रोकडेसह महत्त्वाचे उपकरण चोरून नेले. सकाळी दुकान उघडताना चोरीचा प्रकार उघड झाला.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत चोरट्यांची संख्या दोन ते तीन असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे




















