बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराने अखेर मंत्रालयालाच हादरा दिला आहे! महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या अधिकाऱ्यांविरुद्ध आलेल्या गंभीर तक्रारींवर तत्काळ कारवाईसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला पत्र पाठवले आहे.
श्री. चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांनी शासकीय साहित्य खरेदी-विक्री प्रक्रियेत अक्षरशः ‘दरोडे’ घातले आहेत. शासनाची ध्येयधोरणे डावलून करोडो रुपयांची रक्कम अपहारित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या घोटाळ्याची दखल घेत मंत्रालयाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन स्वतंत्र पत्रे काढली असून, संबंधित अधिकाऱ्यांना आजीवन कारावासाची शिक्षा देऊन अपहारित रक्कम १८% चक्रवाढ व्याजासह वसूल करण्याच्या निर्देशांसाठी आरोग्य विभागाला आदेशित केले आहे.
राज्य शासनाने दिलेला हा आदेश म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या कारभारावर थेट वार ठरतो! आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली शासकीय कोट्यवधींचा अपहार करणाऱ्या तथाकथित ‘व्हाईट कॉलर’ अधिकाऱ्यांचा काळ आता संपणार का, हा प्रश्न जिल्हा जनतेतून उपस्थित केला जात आहे.या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले असून, पुढील काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात मोठे भूकंपसदृश उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे!




















