शेगाव (हॅलो बुलढाणा) संत नगरी शेगाव येथील मटन मार्केटमध्ये एका 35 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची बातमी समोर येत आहे. सकाळी देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा फाटा परिसरात बापाने जुळ्या मुलींची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.यामध्ये आणखी शेगाव येथील घटनेने भर घातली आहे.शेगाव येथील मटन मार्केटमध्ये नितीन उर्फ गोल्या गायकवाड वय 35 याचा खून झाला आहे. हल्ली तो तीन पुतळा परिसर नागझरी रोड येथे राहतो. तो वाशीम येथील मूळ रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा खून पूर्व वैमन्यस्यातून झाल्याचा निष्कर्ष आहे.













Hellobuldana





