बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बसेस दुरुस्तीवर आगाराचे सातत्याने दुर्लक्ष दिसून येत असून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे.आजही एक शिवशाही बस ब्रेक फेल झाल्याने मागील वाहानाला धडकली. बुलढाणा ते खामगाव महामार्गवरील ज्ञानगंगा अभयारण्य अर्थात बोथा घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचा हा अपघात 25 ऑक्टोंबर रोजी दुपारी घडला.
शेगावकडून बुलडण्याच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बस बोथा घाट चढत असतांना बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने बस मागच्या गाडीला जाऊन धडकल्याची घडली. त्यामुळे मागील वाहन पलटी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.या अपघातात मागील वाहनातील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाल्या झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.या अरुंद मार्गावर बस आडवी झाल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय पलटी झालेल्या वाहनाची मोठी क्षति झाली आहे.




















