बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्राचा सी एस सुभाष चव्हाण निलंबित झाल्याचा आनंद जिल्हा सामान्य रुग्णालयात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे सिटी न्यूज चैनल चे अभिनंदन करण्यात आले. सी एस गेल्याने ‘कही खुशी.. कही गम..’ असे चित्र दिसून येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. हे अनेकांना माहित असून याबाबत सिटी न्यूजने वृत्त मालिका सुरू केली होती.ना. प्रतापराव जाधव यांनी या भ्रष्टाचारा संदर्भात प्रश्न उचलल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’ ने वृत्त रेटल्याने हा खादाड निलंबित झाला. सकाळपासूनच सिटी न्यूज चैनल चा दूरध्वनी अभिनंदनची भाषा बोलत आहे. दरम्यान निलंबित सुभाष चव्हाण यांना अमरावती येथे नोकरीसाठी आदेश देण्यात आले आहे.