spot_img
spot_img

जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आ. सिद्धार्थ खरातांचा ‘जनता दरबार’ – जनतेच्या दारात प्रशासन!

मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर – लोणार विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या आणि तक्रारींना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कृषी वैभव प्राईड (के. व्ही. प्राईड हॉल), मेहकर येथे भव्य ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे.

या जनता दरबारात तालुका स्तरावरील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांना आपल्या अडचणी, तक्रारी आणि मागण्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. प्रशासन जनतेच्या दारात पोहोचले पाहिजे, हेच माझे ध्येय आहे. लोकांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकून त्यावर निर्णय घेणे हे माझे कर्तव्य आहे, असे आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट केले.जनतेच्या समस्यांना न्याय देण्याचा हा उपक्रम लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करणारा ठरला आहे. नागरिकांनी आपली तक्रार लेखी स्वरूपात दोन प्रतींमध्ये सोमवार, २९ ऑक्टोबरपूर्वी आमदार खरात यांच्या जनसंवाद कार्यालयात (डोणगाव रोड, मेहकर) सादर करावी. एक प्रत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, तर दुसऱ्या प्रतीवर दरबारात प्रत्यक्ष चर्चा होईल.आमदार खरात यांनी आवाहन केले आहे की, मेहकर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या जनता दरबारात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!