बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अभिता लँड प्रा.लि. सोल्युशनचे सर्वेसर्वा आणि जनतेच्या मनात आपली खास ओळख निर्माण केलेले सुनीलभाऊ शेळके यांनी आज दिवाळीनिमित्त ‘हॅलो बुलढाणा’ सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन कार्यालयाला विशेष भेट देत सदिच्छा व्यक्त केल्या. या भेटीदरम्यान त्यांनी संपादक मंडळाशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत विषयांवर सविस्तर चर्चा केली. ग्रामीण भागातील शेती, पाणीपुरवठा, आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना न्याय्य बाजारभाव मिळावा यासाठी शासनाने राबवावयाच्या योजना यावरही त्यांनी आपली ठाम मते मांडली.
‘हॅलो बुलढाणा’ या वृत्त पोर्टलची झपाट्याने वाढती लोकप्रियता, जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारी पत्रकारिता आणि बातम्यांची सुपरफास्ट गती पाहून शेळके यांनी टीमचे कौतुक करत म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात ‘हॅलो बुलढाणा’ सारखं निर्भीड आणि तत्परतेनं काम करणारे वृत्त पोर्टल दुर्मिळ आहेत.तुम्ही जिल्ह्याचा अभिमान आहात.”
सुमारे 19 लाखांहून अधिक वाचकांपर्यंत पोहोचलेले ‘हॅलो बुलढाणा’ आज बुलढाणा जिल्ह्यातील नंबर वन न्यूज पोर्टल म्हणून नावारूपास आले आहे. सत्य, वेग आणि जबाबदारी या तिन्ही घटकांवर आधारित पत्रकारितेमुळे जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या या पोर्टलला सुनीलभाऊ शेळके यांच्या विशेष भेटीमुळे नवी प्रेरणा मिळाली आहे.
‘हॅलो बुलढाणा’ सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनचा हा उत्साही आणि विश्वासार्ह प्रवास पुढेही असाच गतिमान राहील,असा निर्धार या प्रसंगी टीमने व्यक्त केला.














