बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवाळीच्या शुभ प्रसंगी बुलढाण्यातील जनतेच्या मनात विशेष स्थान असलेले, भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज ‘हॅलो बुलढाणा’ कार्यालयाला भेट देऊन टीमशी संवाद साधला. त्यांच्या या भेटीने ‘हॅलो बुलढाणा’ परिवाराला नवी उर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
शिंदे यांनी ‘हॅलो बुलढाणा’ वृत्त पोर्टलच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेबद्दल समाधान व्यक्त करत, टीमच्या निर्भय आणि जनतेच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या पत्रकारितेचे कौतुक केले. जनतेच्या आवाजाला प्रामाणिकपणे न्याय देणारे व्यासपीठ म्हणून ‘हॅलो बुलढाणा’ ने बुलढाण्याच्या जनतेच्या मनात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राजकारणातील आणि समाजकारणातील त्यांच्या दांडग्या अनुभवाचा दाखला देताना, त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रसिद्ध घोषवाक्याची आठवण करून दिली ‘हात दाखवा, गाडी थांबवा!’ जनतेशी थेट संवाद साधण्याची ही त्यांची शैली आजही कायम असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शिंदे यांनी बुलढाणा शहराला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त बनविण्याचा संकल्प सर्वांसमोर मांडला. “आपण सारे एकत्र आलो, तर बुलढाणा परिवर्तनाचं प्रतीक बनेल. दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे उजेडाचा विजय आणि तोच उजेड आपण जनतेच्या जीवनात आणूया,” असे आवाहन त्यांनी केले.














