spot_img
spot_img

💥EXCLUSIVE आमदार संजय गायकवाड यांची ‘हॅलो बुलढाणा’ कार्यालयाला दिवाळी सदिच्छा भेट! वृत्त पोर्टलच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेचं कौतुक;आमदार गायकवाडही म्हणाले – “खरंच भन्नाट टीम!”

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे ज्वलंत व सरळ बोलणारे आमदार संजय गायकवाड यांनी आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘हॅलो बुलढाणा’ मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट देत टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या भेटीदरम्यान त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडी, मतदारसंघातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून ते माध्यमांच्या जबाबदारीपर्यंत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

आमदार गायकवाड यांनी ‘हॅलो बुलढाणा’च्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेचं विशेष कौतुक करत म्हटलं की, हॅलो बुलढाणा हे केवळ एक न्यूज पोर्टल नाही, तर जनसामान्यांचा आवाज बनलं आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटनेवर बारीक नजर ठेवत योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे या पोर्टलचं खरे सामर्थ्य आहे.

लाखो दर्शक असलेले ‘हॅलो बुलढाणा’ आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक पाहिलं जाणारं व विश्वासार्ह न्यूज पोर्टल म्हणून उदयास आलं आहे. बातम्यांची गती, सत्यता आणि निष्पक्षता यामुळे ‘हॅलो बुलढाणा’ने अल्पावधीतच वाचकांच्या मनात स्थान निर्माण केलं.दिवसभरातील प्रत्येक घडामोडीचे जलद, अचूक आणि प्रभावी कव्हरेज हे या पोर्टलचं वैशिष्ट्य ठरत आहे.

आमदार गायकवाड यांनी भेटीच्या शेवटी ‘हॅलो बुलढाणा’च्या सर्व टीमला आगामी काळासाठी शुभेच्छा देत जनतेच्या हक्कासाठी लढणारी पत्रकारिता कायम राखण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे ‘हॅलो बुलढाणा’ परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!