बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर बुलढाणा शहरातील राम मंदिर परिसरात एक अनोखा आणि धार्मिकतेने ओथंबलेला उपक्रम पाहायला मिळाला! साक्षी अजय लाहोटी (वय २५) या तरुणीने तब्बल ८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर एक अप्रतिम रांगोळी साकारली आहे, जी पाहणाऱ्यांना थक्क करतेय!
या रांगोळीत एका बाजूला भगवान महादेव तर दुसऱ्या बाजूला भगवान श्रीकृष्ण यांचे भव्य चित्रण आहे. दोन्ही देवतांचे अद्वितीय संगम दर्शवणारी ही रांगोळी भक्ती, श्रद्धा आणि कलाकौशल्य यांचा सुंदर मेळ साधते. रंगांच्या माध्यमातून साक्षीने केवळ कलात्मकता दाखवली नाही, तर समाजाला एक संदेश दिला दिवाळीचा खरा अर्थ फक्त सजावट नव्हे, तर श्रद्धा आणि एकात्मतेचा उत्सव आहे.राम मंदिर परिसरात ही रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. अनेकांनी साक्षीच्या या सृजनशीलतेचे कौतुक करत तिच्या कार्याचे स्वागत केले. दिवाळीच्या सणात देवत्व आणि संस्कृतीचा संगम दाखवणारी ही रांगोळी खरंच बुलढाण्याचा अभिमान ठरली आहे