लोणार (हॅलो बुलढाणा) दिवाळीच्या सणात आनंदाचा माहोल असतानाच लोणार तालुक्यात आज सायंकाळपासून पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच जोरदार सरी कोसळू लागल्या. अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने जोर धरला असून रस्ते ओलेचिंब झाले आहेत.
या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे हरभरा आणि ज्वारी पिकांची पेरणी उशिरा झाली त्यात पण शेतकऱ्यांची खूप नुकसान झाले आहे. अनेकांनी पुन्हा एकदा धाडस करून दोबारा पेरणी केली होती. मात्र, आता या मुसळधार पावसामुळे नव्याने पेरलेली पिके धोक्यात आली आहेत. पाण्याचा ताण वाढल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांच्या मते,सण साजरा करण्याऐवजी आम्ही पुन्हा चिंतेत आहोत. प्रशासनाने तात्काळ पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून नुकसानाचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. दिवाळीच्या दिवशी पडलेल्या या पावसाने सणाचा आनंद ओला करून टाकला आहे.