बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यातील सागवान नदीत आज दुपारच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नदीच्या पाण्यावर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस तुकडी दाखल झाली असून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृतदेह नदीत कसा आला, हा अपघात आहे की काहीतरी संशयास्पद प्रकरण आहे, याबाबत सध्या चौकशी सुरू आहे.घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून लोकांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.