रायपुर (हॅलो बुलढाणा) अलीकडे वाहने सुसाट धावताहेत..रस्ते अरुंद झालेत.. वाहनांची संख्या प्रचंड झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.आज पहाटे रायपूर येथे आयशर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला.पेट्रोल पंपा जवळ झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत सूत्राकडून मिळाली आहे.अपघातात मृत पावलेला मुबारक शहा सलीम शहा हा रायपूर येथीलच रहिवाशी होता
किंग फेस्टिवल अर्थात दीपावली हा सण सुरु झालाय..त्यामुळे बाजार फुलला.. रस्त्यांवर गर्दीच गर्दी दिसते.. वाहनांची ही मोठी वर्दळ आहे.. त्यामुळे जिल्ह्यात कुठे ना कुठे अपघातांच्या घटना घडल्याची वार्ता कानावर पडते. आजही एक वार्ता रायपूर येथून भल्या पहाटे धडकली! एका आयशर ट्रकने दुचाकीला उडवले.या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत झाला घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली असून रायपूर पोलीस तात्काळ पोहोचले होते. धाड येथील आयशर ट्रक चालक आरिफ हा रायपूर पोलीस स्टेशनला अटक असून पुढील तपास रायपूर पोलीस अधीकारी व कर्मचारी करीत आहे.दीपावलीच्या शाळेला सुट्या लागल्या तरी बालवाडीला भल्या पहाटे सुकडीचे वाटप कसे?










